महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेत्री रेखाला कोरोना टेस्ट करण्याचा पालिकेचा सल्ला - अभिनेत्री रेखा कोरोना टेस्ट

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला पालिकेने दिला.

rekha
अभिनेत्री रेखा

By

Published : Jul 15, 2020, 12:31 AM IST

मुंबई- बच्चन कुटूंबीयांमधील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सिनेसृष्टीत भीतीचे वातावरण आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला पालिकेने दिला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबईत कोरोना विषाणू इमारतीपासून झोपडपट्टीत, झोपडपट्टीतून पुन्हा इमारतीत आणि आता सिनेकलावंतांच्या बंगल्यात पोहचला आहे. अमीर खान, करण जोहर यांच्या बंगल्यातील कामगार, अभिनेत्री रेखाच्या बंगल्यातील सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सिनेकलावंतांच्या बंगल्यातील कामगार पॉझिटिव्ह आल्याची घटना ताजी असतानाच बच्चन कुटूंबातील अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोना झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. रेखा यांचा एक सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच हा रक्षक रेखाच्या बंगल्याच्या आवारात जिथे राहत होता त्या ठिकाणी पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने हा सल्ला दिला आहे. रेखा या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सुरक्षारक्षकाच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर चाचणीची सक्ती करता येणार नाही. त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि कोरोना चाचणी केली तर तसे पालिकेला कळवावे, असा सल्ला देण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details