मुंबई - संपूर्ण जगामध्ये कोरोना थैमान घालत आहे. राज्यात काल कोरोनाने उद्रेक केला. काल राज्यात 35 हजारपेक्षा जास्त कोरोना बाधीत रूग्ण आढळले. ही समस्या असतांना आता मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईत सध्या सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे रक्तदात्यांना समोर येऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे.
मुंबईत रक्ताचा तुटवडा!; रक्तदान करण्याचं आवाहन - mumbai marathi news
संपूर्ण जगामध्ये कोरोना थैमान घालत आहे. राज्यात काल कोरोनाने उद्रेक केला. काल राज्यात 35 हजारपेक्षा जास्त कोरोना बाधीत रूग्ण आढळले. ही समस्या असतांना आता मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात-
एप्रिल आणि मे महिन्यात नेहमीच रक्त तुटवडा निर्माण होतो. मोठा रक्तदातावर्ग हा तरुण महाविद्यालयीन वर्ग आहे. राज्यात कोरोना वाढतोय. त्यामुळं विद्यार्थी आणि आय टी सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरु आहे. लसीकरणाची मोहिम जोरात सुरु आहे. त्यामुळं लस दिल्यानंतर 28 दिवस रक्तदान न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं रक्त संकलनासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, राजेश टोपे यांनी राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जनतेला लहान लहान रक्तदान शिबीरं आयोजित करण्याचं आवाहन केलंय. तसंच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना देखील आवाहन करण्यात आलंय.
मुंबईत उपलब्ध रक्ताचा साठा आणि मुंबईची गरज-
मुंबईत दिवसाला 600 ते 800 युनिट रक्ताची गरज आहे. सध्या मुंबईत 3800 ते 4000 युनिट रक्ताचा साठा आहे. मुंबई फक्त 8 दिवस पुरेल इतकाच रक्त उपलब्ध आहे. राज्य रक्त परिषदेचे सहायक संचालक अरुण थोरात सांगतात की, लसीकरणामुळं रक्तसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान लहान रक्तदान शिबीरं घेऊन रक्तदान वाढवण्याची गरज आहे.
हेही वाचा-मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय