मुंबई: बेरोजगारी आणि महागाईवरून लक्ष वळवण्यासाठी लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचे भाजपचे राजकारण आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही सणांना परवानगी देऊ आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल असे सांगत त्यांनी आगामी गुढी पाडव्याचा सण साजरा करण्या संदर्भात तसेच त्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां सदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुचक वक्तव्य केले आहे. गुढीपाडवा आणि राम नवमी सण साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून केला जातो.
Home Minister On Bjp : लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचे भाजपचे राजकारण
बेरोजगारी आणि महागाईवरून प्रश्न लक्ष हटवण्यासाठी (To divert attention from the question of unemployment and inflation) भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण (BJP's politics of creating division among the people) करत आहे. अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर सण-उत्सव साजरे करण्यासाठी राज्य सरकार देखील परवानगी देणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गुढीपाडवाच्या शोभायात्रा काढण्यासाठी लवकरच परवानगी दिली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांचा परवानगीने दिल्यानंतर मार्गदर्शक तत्वे काढली जाणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत आपल्या दालनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. बेरोजगारी आणि महागाई यामुळे मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच प्रयत्न करत असते. यामुळेच सण सोहळे जाती धर्मांवर वक्तव्य करू लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाकडून केला जातोय असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कडून करण्यात आला आहे.
TAGGED:
Home Minister On Bjp