मुंबई - मागील महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Winter Session 2021) महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर भाजप आक्रमक झालेली आहे. भाजपने राज्यभर याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याचाच प्रत्यय आज मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) समोर आला. भाजप युवा मोर्चातर्फे (BJP Yuva Morcha) मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या नेतृत्वात आज नारेबाजी करण्यात आली.
BJP yuva Morcha protest : भाजप युवा मोर्चाचे विद्यापीठ सुधारणा विधेयक विरोधात आंदोलन
मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या नेतृत्वात नारेबाजी करण्यात आली असून, आज मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) समोर भाजप युवा मोर्चातर्फे (BJP Yuva Morcha) आंदोलन करण्यात आले.
BJP yuva Morcha protest
विद्यापीठ सुधारणा विधेयक हे विद्यापीठावर गदा आणणारे आहे. असा आरोप भाजप तर्फे करण्यात आलेला आहे. कुलगुरूंचे अधिकार आता प्र-कुलगुरूंना देण्यात आल्याने विद्यापीठ आपल्या हातात घेण्याचे षड्यंत्र महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. याविरोधात मुंबईतील फोर्ट परिसरातील मुंबई विद्यापीठाच्या गेटसमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. याप्रसंगी मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. 'कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठांना विकू दिल जाणार नाही.', 'विद्यापीठांना असलेले अधिकार हे बाधित राहिले पाहिजेत' अशा पद्धतीची नारेबाजी याप्रसंगी करण्यात आली.