मुंबई - मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेत भाजपचा महपौर ( bjp win mumbai corporation election ) बसेल, असा विश्वास भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला ( bjp mla amit satam ) आहे. तसेच, सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपचा संबंध नसल्याचेही साटम यांनी सांगितले आहे.
'भाजपचा संबंध नाही' - भाजपाची नियमीत कार्यकारणी बैठक आज ( 25 जून ) येथील वसंत स्मृती येथे संपन्न झाली. या बैठकीची माहिती देताना साटम बोलत होते. यावेळी बोलताना साटम म्हणाले की, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात पालिका निवडणुक तयारीबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या राजकीय भूकंप झाला असून, त्याच्या मागे भाजप असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, आताच्या परिस्थितीशी भाजपचा संबंध नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, असे साटम यांनी म्हटलं.