मुंबई : महाराष्ट्रातील घडलेल्या राजकीय भूकंपानंतर ( After the political earthquake ) काल अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ( After Resignation of CM Uddhav Thackeray ) सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सागर निवासस्थानी होत आहे. या बैठकीला राज्याचे प्रभारी सी. टी. रवी ( In charge c. T. Ravi ) हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासाठी देवेंद्र फडवणीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस :देवेंद्र फडणवीस हे जनता पक्षाचे तरुण नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. फडणवीस हे महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आहे. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आहेत. मागील 2014 च्या विधान सभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 31 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी 44 व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता 2019 च्या विधान सभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरीही युती तुटल्याने त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती. 2019 ला महाविकास आघाडी स्थापन होऊन सेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडली होती. त्यामुळे मी पुन्हा येईन! अशी घोषणा देणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले. परंतु आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे सेनेच्या बंडखोर आमदारांमुळे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता असल्याने देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
उद्या शपथविधी होण्याची शक्यता :महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळल्यानंतर, मी पुन्हा येईन असे सांगणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक राहिलेला आहे. या संदर्भामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक आज देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी सकाळी १०:३० वाजता होत आहे. या बैठकीमध्ये पुढील रणनीती आखली जाणार आहे. उद्या सायंकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. विशेष करून एकनाथ शिंदे गट अजून मुंबईमध्ये आलेला नाही आहे. कदाचित उद्या शपथविधीदरम्यान ते मुंबईत उपस्थित होतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.