महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bjp Vs Nana Patole : राज्यपालांनी सरकारला नाना पटोलेंवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण ( Nana Patole On Narendra Modi ) झाला आहे. पटोलेंच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांनी निदर्शने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन नाना पटोलेंवर कारवाई करण्यासाठी सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे.

Bjp meet Governor BhagatSingh Koshyari
Bjp meet Governor BhagatSingh Koshyari

By

Published : Jan 19, 2022, 5:57 AM IST

मुंबई-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Nana Patole On Narendra Modi ) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. पटोलेंच्या विरोधात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांनी निदर्शने केली आहे. त्यातच आता भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन नाना पटोलेंवर कारवाई करण्यासाठी सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी केली ( Bjp Maharashtra Meet Governor BhagatSingh Koshyari ) आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ( Mla Pravin Darekar ) नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राज्य सरकारला कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी राज्यापाल कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली.

काय म्हणाले होते नाना पटोले?

गोंदियात प्रचार सभेनंतर नागरिकांना बोलानात नाना पटोले म्हणाले की, "गेल्या तीस वर्षापासून मी राजकारण करत आहे. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून मागे एक ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारू शकतो, त्यांनी शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले," असे बोलतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला.

हेही वाचा -'शाहिस्तेखानाची बोटही महाराष्ट्रात छाटली गेली होती; त्यामुळे तुमचा..'; पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली

ABOUT THE AUTHOR

...view details