मुंबई - मतदानोत्तर चाचणीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे प्रसार माध्यमांनी सांगितल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भाजप कार्यालयात आतापासूनच जल्लोषाची जोरात तयारी सुरू आहे. पेढे आणि लाडू वाटपासाठी कार्यलयाच्या आवारात खास टेबल ठेवण्यात आले आहेत. उद्या (गुरुवारी) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच कार्यलयात कार्यकर्त्यांची वर्दळ असेल, असे भाजप प्रसारमाध्यम संयोजक श्याम सप्रे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
भाजप कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरू; मिठाई वाल्यांसह वाजंत्र्यांनाही दिल्या ऑर्डरी - mla
भाजप प्रदेश कार्यालयाला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. आवारात कार्यकर्त्यांसाठी मंडप घालण्यात आला आहेत. भाजप कार्यकर्ते बहुमताचा जादुई आकडा पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. त्यासाठी कार्यालयात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भाजप कार्यालयात जल्लोषाची तयारी
भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या या जल्लोषात मुंबईतील लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार ही सहभागी होतील, असेही सप्रे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढत आहे. भाजप प्रदेश कार्यालयाला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. आवारात कार्यकर्त्यांसाठी मंडप घालण्यात आला आहेत. भाजप कार्यकर्ते बहुमताचा जादुई आकडा पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. त्यासाठी कार्यालयात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.