Gopal Shetty Arrested: भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले - खासदार गोपाळ शेट्टी
महाराष्ट्र सरकारचे (Government of Maharashtra) क्रीडा मंत्री सुनील केदार (Sports Minister Sunil Kedar) यांच्या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्या खासदार गोपाळ शेट्टी (MP Gopal Shetty) आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपाळ शेट्टी पोलिसांनी ताब्यात
मुंबई:गोपाळ शेट्टी यांच्यासह भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन केले.कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याच्या विरोधात निदर्शने केली. या प्रकरणी आझाद नगर पोलीसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले आहे. अटकेनंतर कार्यकर्त्यांनी घोषनाबाजी केली.