मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadnavis ) पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर झाला आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ( Rahul Narvekar Filed Application Assembly Speaker ) आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने आणखी धक्का भाजपने दिला आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाने गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा केला होता. त्यासाठी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.