महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाहीतर संघर्ष अटळ आहे..! भाजप आमदार नितेश राणेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार आज (सोमवारपासून) सर्व दुकाने खुली करण्यात येणार आहेत. आम्ही व्यापाऱ्यांच्या दुकानं पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला समर्थन देत आहोत. आम्ही सर्व व्यापारी बांधवांसोबत असून महाराष्ट्र सरकारने व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे

भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा
भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा

By

Published : Apr 12, 2021, 11:53 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार सुरू आहे. सध्या विकेंड लॉकडाऊन सुरू असून शनिवार आणि रविवारी सर्व दुकानं बंद ठेवली जात आहेत. मात्र यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

नाहीतर संघर्ष अटळ आहे..! भाजप आमदार नितेश राणे

नितेश राणे यांचं ट्विट..

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार आज (सोमवारपासून) सर्व दुकाने खुली करण्यात येणार आहेत. आम्ही व्यापाऱ्यांच्या दुकानं पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला समर्थन देत आहोत. आम्ही सर्व व्यापारी बांधवांसोबत असून महाराष्ट्र सरकारने व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे', असा निर्वाणीचा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलाय. ट्विटद्वारे राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध..

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात सर्व जिल्ह्यांत निर्बंध घालण्यात आले आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे आधीच नुकसान झालेले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान करु नये, अशी भूमिका राज्यात अनेक व्यापारी संघटनांची आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांनी निर्बंधांना विरोध केला आहे. तसेच, आम्हाला दुकानं सुरू ठेवण्यास निर्बंध घालू नयेत. आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सर्व ती काळजी घेऊ, असे आश्वासन अनेक संघटनांकडून दिले जात आहे.

पूर्ण लॉकडाऊनला विरोधी पक्षाचा विरोध-

राज्यात कोरोनाग्रस्त वाढत असल्यामुळे राज्य सरकार पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत आहे. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सध्या जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू न करता कठोर निर्बंध लागू करावेत,’ अशी भूमिका घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details