महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पवारसाहेब गरीब शेतकऱ्यांसाठीही एक पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवा - अतुल भातखळकर - अतुल भातखळकर

हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

bjp mla atul bhatkhalkar
bjp mla atul bhatkhalkar

By

Published : May 8, 2021, 2:58 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ते राजकारण आणि आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबईची सफर केली. कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी केलेले ट्विट

शेतकऱ्यांसाठीही एखादं पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे -

माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो’, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी केलेले ट्विट
मराठा समाजाच्या आपल्याकडे खूप आशा आहेत -
‘मा. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय’, असं ट्वीटही भातखळकर यांनी केलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details