महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सरकार वाईन उत्पादकांसाठी उदार, शेतकऱ्यांसाठी गद्दार' - शेतकरी

कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण पुढे करून मागील वर्षभरात शेतकऱ्यांना व शेतीपूरक व्यवसायांना एका रुपयाचीही सुद्धा मदत या सरकारने केली नाही. मात्र अर्थपूर्ण संवाद साधत काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे.

'सरकार वाईन उत्पादकांसाठी उदार, शेतकऱ्यांसाठी गद्दार'
'सरकार वाईन उत्पादकांसाठी उदार, शेतकऱ्यांसाठी गद्दार'

By

Published : Mar 24, 2021, 4:00 PM IST

मुंबई : सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, बोंडअळी, किड आणि आता झालेली गारपीट यामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना एका रुपयाचीही मदत न करणाऱ्या सरकारने वाईन उत्पादकांवर मात्र प्रोत्साहनाच्या नावाखाली तब्बल चाळीस कोटी रुपयांची उधळण केली आहे. त्यामुळे हे सरकार 'वाईन उत्पादकांच्या बाबतीत उदार पण शेतकऱ्यांच्या बाबतीत गद्दार' असल्याची टीका मुंबई भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

'सरकार वाईन उत्पादकांसाठी उदार, शेतकऱ्यांसाठी गद्दार'

सरकार वाईन उत्पादकांना मदत करते, शेतकऱ्यांना नाही
कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे कारण पुढे करून मागील वर्षभरात शेतकऱ्यांना व शेतीपूरक व्यवसायांना एका रुपयाचीही सुद्धा मदत या सरकारने केली नाही. मात्र अर्थपूर्ण संवाद साधत काही विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आवश्यकता होती. परंतु प्रत्येक वेळी सरकारकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहेत. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या सभागृहात आणि बाहेर आवाज उठविला. तसेच अनेक वेळा आंदोलनही करण्यात आले. परंतु याची कोणतीही तमा न बाळगता सरकारने आधी दारू विक्रेत्यांच्या वार्षिक फी आणि करात सवलत दिली. आता तर दारू व वाईन उत्पादनातून करोडो रुपये कमावणाऱ्या वाईन उत्पादकांना 2017 पासूनची प्रोत्साहनपर थकबाकी म्हणून चाळीस कोटी रुपयांची मदत केली. यातून या सरकारची शेतकऱ्यांविषयीची मानसिकता लक्षात येते अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details