महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...तर रश्मी शुक्ला यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही - सुधीर मुनगंटीवार - mumbai marathi news

फोन टॅपिंग प्रकरणाला राजकीय वळण मिळत आहे. आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर टिका केली. यावर भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे.

एका महिला अधिकाऱ्याला इतक वेठीस धरणं योग्य आहे का? - सुधीर मुनगंटीवार
एका महिला अधिकाऱ्याला इतक वेठीस धरणं योग्य आहे का? - सुधीर मुनगंटीवार

By

Published : Mar 25, 2021, 8:05 PM IST

मुंबई - राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर टिका केली. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तरी त्यांनी फोन टॅप केले आहेत. त्या भाजपच्या एजंट आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे. जर रश्मी शुक्ला यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर हे सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.

...तर रश्मी शुक्ला यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही - सुधीर मुनगंटीवार

एका महिला अधिकाऱ्याला इतक वेठीस धरणं योग्य आहे का?-

"जर रश्मी शुक्ला यांनी काही चूकी केली असेल. तर हे सरकार त्यांच्यावर कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे? मंत्रीमहोदय फक्त त्यांच्यावर का टीका टिप्पणी करत आहेत. एका महिला अधिकाऱ्याला इतक वेठीस धरणं योग्य आहे का? हा संपूर्ण अहवाल रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची कल्पना मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री का गप्प आहेत", असा सवाल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

सरकारचा अजब न्याय-

"एकीकडे सत्तेतील सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेले आहे. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिल आले होते. त्या वीजबिलांची माफी सुद्धा या सरकारने केलेली नाही आहे. या सगळ्या गोष्टी संदर्भात सरकार कोणतं पाऊल न उचलता. रश्मी शुक्ला यांच्यावरती कारवाई करण्याचं पाऊल उचलत आहे. रश्मी शुक्ला यांनी ही चोरी बाहेरू उघडकीस आणली म्हणून त्यांच्यावर कारवाई आणि चोरी करणारे मात्र मोकाट, हा कोणता सरकारचा अजब न्याय आहे", अशी प्रतिक्रिया भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?-

महाविकास आघाडी सरकार स्थापनेआधी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी गुप्त विभागाच्या तत्कालीन रश्मी शुक्ला धमकावत होत्या. स्थानिक डीवायएसपी यांनी देखील 'हमारे साथ चाय पीओगे तो, कोई नमक हरामी हो जायेगी क्या', असा शब्दांत यड्रावकर यांना धमकावत होते. तसेच गुप्तचर विभागामार्फत त्यांच्या हालचालीवर देखरेख आणि फोन टॅपिंग करण्यात येत होते. फोन टॅपिंग करणे, ही विकृती आहे. तसेच फोन टॅप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे त्यासाठी काही निकष आहेत. रश्मी शुक्ला यांनी या निकषांची पायमल्ली केली आहे, असे आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणाबाबत चौकशी सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, असे आव्हाड म्हणाले.

यापुर्वी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारनेही सहानुभूती दाखवत शुक्ला यांना मोठ्या मनाने माफ केले. याचाच गैरफायदा त्यांनी घेतला. मात्र यापुढे कोणाच्याही चुकीला माफी मिळणार नाही, असा सूचक इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

हेही वाचा-LIVE Updates : वाझेच्या बॅगमध्ये पैसे? हॉटेलमधला आणखी एक सीसीटीव्ही समोर

ABOUT THE AUTHOR

...view details