मुंबई-काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारवर कडक शब्दात सुरक्षेच्या मुद्यावरून ताशेरे ओढले आहेत. २६/११ दहशतवादी हल्ल्यावर आधारित या पुस्तकात भाष्य करण्यात आलेले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी (congress leader Manish Tiwari) यांनी युपीए सरकारवर निशाणा साधल्यानंतर भाजपला आयते कोलित भेटले आहे. यावर भाष्य करताना भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर हल्लाबोल केला आहे. २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याऐवजी मनमोहन सिंग सरकार हातावर हात ठेवून बघत राहिले. मनीष तिवारी यांनी आता हे स्वतःहून स्वीकार केले आहे. २६/११ हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकार पूर्णपणे पाकिस्तानला उत्तर देण्यास अपयशी ठरले, हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे. मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या हायकमांडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असेही राम कदम म्हणाले.
हेही वाचा-विरारमध्ये 'जय भीम'ची पुनरावृत्ती; पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांची मारहाण
१८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे हल्ला झाला. मोदी सरकारने १० दिवसातच पाकिस्तानला त्याचे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा हल्ला झाला. त्याचे उत्तरही बारा दिवसात देण्यात आले. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे उत्तम काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे, भाजप नेते कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-पहाटेचा शपथविधी : ऐका, 'त्या' शपथविधीविषयी काय बोलून गेले अब्दुल सत्तार!