महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar Mumbai Bank Case : माझ्या चौकशीसाठी पोलिसांवर दबाव - प्रविण दरेकर

भाजपा नेते प्रविण दरेकर ( BJP leader Pravin Darekar ) यांची आज (सोमवारी) तब्बल चार तासानंतर माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये ( Mata Ramabai Ambedkar Police Station Inquiry ) चौकशी संपली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा पोलिसांचा दबावतंत्राचा भाग असल्याचे सांगितले आहे. पोलिसांवर दबाव आहे, म्हणून माझी वारंवार चौकशी ( Mumbai Bank scam issue ) केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर

By

Published : Apr 11, 2022, 4:02 PM IST

मुंबई - मुंबई जिल्हा बँकेत मजूर प्रकरणावरून ( Mumbai Bank Labor case ) चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले भाजपा नेते प्रविण दरेकर ( BJP leader Pravin Darekar ) यांची आज (सोमवारी) तब्बल चार तासानंतर माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये ( Mata Ramabai Ambedkar Police Station Inquiry ) चौकशी संपली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी हा पोलिसांचा दबावतंत्राचा भाग असल्याचे सांगितले आहे. पोलिसांवर दबाव आहे, म्हणून माझी वारंवार चौकशी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सध्या राज्यात ज्या पद्धतीने भाजपा महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करत आहे, त्याचा राग मनात धरून हे सर्व केले जात आहे, असा आरोपही दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर लगावला आहे.



'कितीही चौकशी करा मी घाबरत नाही?' :मुंबई जिल्हा बँक मजूर प्रकरणात चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा भाजपा नेते, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांची आज तब्बल ४ तास चौकशी केली. मला वारंवार तेच, तेच प्रश्न विचारले जात आहेत. मागच्या चौकशीत सुद्धा मी सहकार्य केले होते. आजही चौकशी करण्यात आली. परंतु यात पोलिसांचा दोष नाही, तर पोलिसांवर दबाव असल्याकारणाने ते माझी चौकशी करत आहेत. पण मी यातून पळ काढणारा नाही तर मी कायद्याला प्रतिसाद देणारा व्यक्ती आहे. जे काही आहे ते मी सर्व समोर मांडलेले आहे. त्याचबरोबर याबाबत कितीही चौकशी झाली तरी मी घाबरणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले.



'किरीट सोमैया पळणारे नाही तर पळवणारे नेते' :भाजपा नेते किरीट सोमैया व त्यांचा मुलगा नील सोमैया यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, किरीट सोमैया हे पळ काढणारे नेते नाहीत तर ते इतरांना पळवणारे नेते आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याकारणाने त्यांचे अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही. म्हणून ते समोर येत नाही आहेत. परंतु ते लवकरच समोर येतील. महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचारी नेत्यांची प्रकरणे ते बाहेर काढत असल्याकारणाने सुद्धा त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारचा द्वेषाच्या भावनेतून हे करत आहे, असेही प्रविण दरेकर म्हणाले.



'फोन टॅपिंग प्रकरणी वस्तुस्थिती समोर येईल' :शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंगवर बोलताना दरेकर म्हणाले, की हे काही सुडाच्या भावनेने कोणी केलेले नाही आहे. याबाबत देवेंद्र फडवणीस यांनी वस्तुस्थिती समोर मांडलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये जे काही तथ्य असेल ते लवकरच समोर येईल. त्या कारणास्तव विनाकारण नको, त्या गोष्टीला महत्त्व देण्यात अर्थ नाही, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा -Mahatma Phule Birth Anniversary : महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आधुनिक भारताचा पाया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details