मुंबई -महागाई, बेरोजगारी व मोदी सरकारची दडपशाही याच्याविरोधात आज ( 5 ऑगस्ट ) काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले ( congres protest against inflation and ed ) आहे. मुंबईतही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरती भाजप नेते प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे. हे आंदोलन नौटंकी आहे. गांधी कुटुंबाला खुश करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न होता, असेही दरेकर यांनी म्हटलं. मुंबईतील निवासस्थानी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद( pravin darekar attacks congres protest ) साधला.
'गांधी कुटुंबाला खुश करण्यासाठी प्रयत्न' -प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसची संपूर्ण देशभर नौटंकी सुरू आहे. ईडी काय आज स्थापन झाली नाही. हा काही जनतेचा प्रश्न नाही. महागाई, बेरोजगारी यावर आंदोलन करत आहात हे सर्वफक्त एका कुटूंबाला खुश करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेर १०० पोलीस होते. पण, एक कार्यकर्ता नव्हता, असेही दरेकरांनी म्हटलं आहे.
'महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम' - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका पक्षपातीपणाची असल्याचा आरोपही काँग्रेस करत आहे. त्यावर दरेकरांनी सांगितलं की, राज्याला वेळ देणारा राज्यपाल मी २५ वर्ष पाहिला नाही. राज्यपाल रोज ५० लोकांना भेटतात. फक्त नौटंकीसाठी काहींना भेट हवी होती. आंदोलन या देशात करायचा अधिकार आहे, पण नौटंकी करायचा हा हेतू असेल तर, यांना महागाईचे काही पडले नाही, असे सांगत, महागाई, बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम आहेत, असेही दरेकरांनी स्पष्ट केलं.