मुंबई -भाजप नेते किरीट सोमैया विरुद्ध राज्य सरकार हा सामना काही शमताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी किरीट सोमैया यांनी मुलुंड पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर किरीट सोमैया यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्यांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम सोमैया यांनी ठेवला होता. यास मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. ही कारवाई करताना अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमैया यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांना धडा शिवकणार, असा इशाराही सोमैया यांनी केला आहे.
सत्ताधारी पक्षाचे दोन गुंडही होते
आदेश नसताना बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याबरोबर कारवाईसाठी आलेल्या अधिकारी आणि गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. सत्ताधारी पक्षाचे दोन गुंडही होते, असा आरोप करत सोमैया म्हणाले, मी वेळेवर पोहोचलो नसतो तर त्यांनी माझ्या कार्यालयाचे तोडफोड केली असती. त्यामुळे मला सखोल चौकशी हवी, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे.
मी ठाकरे आणि पवारांच्या गुंडगिरीला घाबरत नाही