महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवीन वर्ष नवाब मलिक तुरुंगात साजरे करतील - हाजी अराफत शेख - हाजी अराफत शेख

भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवीन वर्ष हे नवाब मलिक तुरुंगात साजरे करतील. लवकरच तुम्हीसुद्धा अनिल देशमुख यांच्या बाजूला असाल, असे भाकीत हाजी यांनी केले आहे.

Haji Arfat Shaikh
हाजी अराफत शेख

By

Published : Nov 12, 2021, 6:38 PM IST

मुंबई -आर्यन खान ड्रग प्रकरणावरून सुरू झालेले प्रकरण आता अल्पसंख्याक खात्याच्या अंतर्गत झालेल्या घोटाळ्यापर्यंत पोहचले आहे. आज भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवीन वर्ष हे नवाब मलिक तुरुंगात साजरे करतील. लवकरच तुम्हीसुद्धा अनिल देशमुख यांच्या बाजूला असाल, असे भाकीत हाजी यांनी केले आहे.

नवाब मलिक मंत्री बनले तसे त्यांनी एका रिटायर्ड अधिकारी अनिस शेख यांना अनधिकृतपणे नियुक्ती दिली. महाराष्ट्राचे भ्रष्ट मंत्री अल्पसंख्याकचे मुद्दे सोडून स्वतः च्या जावयाचे दुःख दाखवत आहेत. महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाची जमीन हडपण्यासाठी हे करण्यात आले, असे हाजी म्हणाले.

कसून चौकशी झाली पाहिजे -

मुंब्रामधील झुम्मा मस्जिदमध्ये पहिला घोटाळा केला, भाड्याने देऊ शकत नसतानाही ती जमीन 9 कोटीला भाड्याने दिली. याबाबत खालिद कुरेशी यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नवाब मलिक आणि मंत्रालयाला मेल केला होता. त्यामुळे याची ईडीमार्फत कसून चौकशी झाली पाहिजे, कोणाच्या अकाऊंटला दोन करोड गेले होते हेही कळले पाहिजे, अशी मागणी हाजी अराफत शेख यांनी केली आहे.

कारवाईबाबत ते बोलत नाहीत -

पुण्यातील एका ट्रस्टच्या अकाऊंटला पैसे आले होते, मात्र, वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय हे पैसे जात नाहीत. या प्रकरणी 2 करोड रुपये नवाब मलिक यांना देणार होते, मात्र जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा नवाब मलिक यांनी ते पैसे ट्रस्टच्या अकाऊंटला ट्रान्सफर करून या प्रकरणी हुशारी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणी ज्यांची स्वाक्षरी होती, त्यांच्या कारवाईबाबत ते बोलत नाहीत, असेही हाजी म्हणाले.

रिटायर्ड अधिकारीला कसे पुन्हा अधिकारी बनवले?

नवाब मलिक, सीईओ आणि डेप्युटी सीईओ हे बिल्डरांना फोन करून 100 कोटीची जमीन 20 कोटीला देतात, याबाबत ना हरकत दिले जाते, जे जास्त पैसे देतात त्यांच्या फेव्हरमध्ये ऑर्डर दिल्या जातात. 25 हजार लोकांनी माझ्याकडे जमीनबाबत तक्रार केली आहे. एका क्लर्कला एका रिटायर्ड अधिकारीला कसे अधिकारी बनवले याचे उत्तर हवे आहे? याबाबत त्यांच्याकडे उत्तर मागितले असता, ते औरंगाबादला तक्रार करण्यास सांगतात, मात्र मस्जिद आणि मदरसेबाबत लोकं गेल्यावर जमिनीवर बसावे लागते, असेही हाजी यांनी सांगितले.

सर्व यंत्रणाना माहिती देणार आहे

नवीन वर्ष तुम्ही जेलमध्ये काढणार आहात. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देणार आहे. याआधीच सीबीआय, डीआरआय, ईडी संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे. तुमचे अंडरवर्ल्ड संबंध, पत्रकार हत्या, भंगारवाला मोठा कसा झाला याची सगळी माहिती सांगेल, असेही हाजी म्हणाले.

हेही वाचा -Nawab Malik on ETV Bharat : अन्यायाविरोधात लढण्याची हीच ती योग्य वेळ - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details