मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त OBC आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर टीका केलीय. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाप्रमाणे या सरकारने ओबीसीची वाट लावली - चित्रा वाघ - ओबीसी आंदोलन
ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत भाष्य केलेले होते. मग सरकार म्हणून आपण काय केलतं? आधी मराठा आता OBC समाजाची माती केली, आणि आता म्हणता की आम्ही OBC साठी लढू, मात्र तुमच्या नाकर्त्यापणामुळे आरक्षण गेले आहे. लढायला आम्ही भक्कम आहोत, सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत भाष्य केलेले होते. मग सरकार म्हणून आपण काय केलतं? आधी मराठा आता OBC समाजाची माती केली, आणि आता म्हणता की आम्ही OBC साठी लढू, मात्र तुमच्या नाकर्त्यापणामुळे आरक्षण गेले आहे. लढायला आम्ही भक्कम आहोत, सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटचा आधार घेत त्यांना सरकारला हा जाब विचारला आहे.
निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे परिणाम’
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करून आरक्षणाच्या प्रश्नावरून टीका केली आहे. ‘ठाकरे सरकारचा आणखी एक प्रताप. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. वारंवार सूचना करून देखील ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली. निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे हे परिणाम आहेत, होते ते देखील सांभाळता आले नाही’, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.