महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

न्यायालयाने सीईटीची परीक्षा रद्द केल्यानंतर आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका - आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका

अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत,या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका राज्य सरकारनं केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने सीईटीची परीक्षा रद्द केल्यानंतर आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका

आशिष शेलार
आशिष शेलार

By

Published : Aug 11, 2021, 1:45 PM IST

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षेचा अध्यादेश राज्य सरकारने 28 मे रोजी काढला होता. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर ही टीका केली. “छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी झालेय, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी सरकारवर केली आहे.

आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका
अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आले. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करूसरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. याबाबतीतले निकष तपासून पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली.

राज्यातील शाळा सुरू होणार-

कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातीलही आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधित आज शासनाने आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details