महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेच्या २ ए आणि मेट्रो ७ टप्प्यांचे उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या- केशव उपाध्ये - भाजप प्रदेश कार्यालय

गेल्यावर्षी ३१ मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधानिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी याप्रसंगी केली.

KESHAV UPADHYE
KESHAV UPADHYE

By

Published : Mar 31, 2022, 7:32 PM IST

मुंबई - येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या २ए आणि मेट्रो ७ च्या टप्प्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्‍क्‍यांहून अधिक काम देवेंद्र फडणीस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे. तरीही असतानाही मुंबईकरांना वेठीस धरून उर्वरित कामास तब्बल तीन वर्षे विलंब लावल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
ठाकरे सरकारने आपले नाकर्तेपण सिद्ध केले
गेल्यावर्षी ३१ मे रोजी या मार्गावरील मेट्रो रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर अपुऱ्या सुविधानिशी मेट्रो सुरू करणारे ठाकरे सरकार म्हणजे आयत्या उभारलेल्या गुढीची पूजा करण्यासाठी उपटलेला अनाहूत यजमान आहे, अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी याप्रसंगी केली. अजूनही या मार्गावरील स्थानकांची कामे पूर्ण झालेली नाहीत ज्या ठिकाणी शनिवारी या कामाचे उद्घाटन होणार आहे. तेथे अजूनही जिन्यांची कामे देखील अर्धवट अवस्थेत आहेत. फडवणीस सरकारच्या काळातील विकासकामांची गुढी उभारण्यासाठी पुढे येऊन ठाकरे सरकारने आपले नाकर्तेपण सिद्ध केले आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.
एक तरी विकास प्रकल्प दाखवावा? शिवसेनेची रसातळाला गेलेली प्रतिमा सावरण्याकरिता फडवणीस सरकारच्या कामाचे श्रेय घेण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची धडपड मुंबईकरांनी ओळखली आहे. या मेट्रोच्या कामाला तीन वर्षे विलंब करून दाखविल्यानंतर त्याच्या उद्घाटनाचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे सरकारने मेट्रोची अडवणूक केली आहे. केवळ अहंकार आणि हट्ट या पायी मेट्रो कार शेड प्रकल्पास स्थगिती देऊन मुंबईकरांची ही सुविधा वेठीस धरणाऱ्या ठाकरे सरकारने आपल्या कर्तबगारीवर आखलेला आणि पूर्ण केलेला एक तरी विकास प्रकल्प दाखवावा असं आव्हानही उपाध्ये यांनी याप्रसंगी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details