महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बाऊन्सर नेमण्यापेक्षा पालिका आयुक्तांनी लोक प्रतिनिधींशी संवाद साधावा - भाजपा - मुंबई पालिकेत बाऊन्सर

भाजपाच्या लोकप्रतीनिधींशी संवाद न साधता बाऊन्सर नेमण्याचा प्रताप आयुक्तांनी केला आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या संरक्षणासाठी 18 बाऊन्सर नेमले आहेत. हा करदात्या मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय केला आहे. असा आरोपही भाजपाने केला आहे.

बाऊन्सर
बाऊन्सर

By

Published : Aug 11, 2020, 8:03 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालिका आयुक्त निर्णय घेत असून खर्चही करत आहेत. त्यामधून आयुक्तांनी जम्बो घोटाळा आणि भ्रष्टाचार केला आहे. त्याविरोधात भाजपाने आवाज उचलला. त्याचाच धसका घेऊन आयुक्तांनी आपल्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमले आहेत. असे बाऊन्सर नेमण्यापेक्षा पालिका आयुक्तांनी लोक प्रतिनिधींशी संवाद साधावा असे आवाहन भाजपाचे स्वीकृत नगरसेवक व पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केले आहे.

भालचंद्र शिरसाट यांची प्रतिक्रिया

मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना, पालिकेने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. यात पीपीई किट, ग्लोजपासून मृतदेहाच्या बॅगपर्यंत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याबाबत लेखी पत्र दिल्यावर त्याला आयुक्तांनी उत्तरे दिलेली नाहीत. पालिका प्रशासन खर्च करत असताना कोणत्याही बैठका घेत नसल्याने याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याने पालिका आयुक्तांच्या विरोधात भाजपाने आंदोलन केले आहे. त्याचा धसका घेत पालिका आयुक्तांनी आपल्या आणि अतिरिक्त आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नियुक्त केले आहेत.

हेही वाचा -मुलीने प्रेमविवाह केल्याने मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण, मंगळवेढ्यातील घटना

याबाबत बोलताना कोरोनाच्या काळात पालिका आयुक्तांनी कोणालाही विश्वासात न घेता कुठल्याही समितीची बैठक न घेता जम्बो घोटाळा आणि भ्रष्टाचार केला आहे. त्याचा पर्दाफाश करण्यासाठी मृतदेह बॅग, खासगी रुग्णालयातील बेड्स, बेस्टची वाढलेली बिले, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्याचे आदेश असतील त्याविरोधात भाजपाने आंदोलने केली. अशा प्रत्येकवेळी आयुक्त त्यांच्या कॅबिनमधून पळून गेल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

हेही वाचा -'सैराट जोडप्याला फिल्मी स्टाईल अटक'...वाचा सविस्तर

भाजपाच्या लोकप्रतीनिधींशी संवाद न साधता बाऊन्सर नेमण्याचा प्रताप आयुक्तांनी केला आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या संरक्षणासाठी 18 बाऊन्सर नेमले आहेत. हा करदात्या मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय केला आहे. या ऐवजी त्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधावा आणि त्यामधून मार्ग काढावा म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसेल, मुंबईकर जनतेचा पैसा वाचेल आणि जम्बो घोटाळ्याला चाप बसेल असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -महापालिका आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर; पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरोसा नाही का? विरोधकांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details