'मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?' - सुशांत सिंह मृत्यू सीबीआय तपास
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना सीबीआयला सहकार्य करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. यावर 'मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का,' असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारला केला आहे.
मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, अशी सूचनादेखील न्यायालयाने केली आहे. यावर 'मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली, त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का,' असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारला केला आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी आणि भाजपने केली होती. त्यानुसार, आज न्यायालयाने निकाल देत सीबीआयकडे तपास सोपवावा, असे निर्देश सरकारला केले आहेत. त्यामुळे सुशांतला आता न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
'पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!" हा "सिंघम" चित्रपटातील डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी हे का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक, ख्यातीप्रमाणे काम करू दिले नाही,' असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.