मुंबई - शहरातील भेंडी बाजार येथील बिलाल मशीद ठिकाणी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांची मशीद प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग नागरिकांमध्ये होऊ नये म्हणून बिलाल मशीद प्रशासनाकडून फ्लू डिटेक्टर लावण्यात आले होते. मशिदीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची फ्लू डिटेक्टरने तपासणी करून नंतरच त्याला आत सोडले जात होते.
नमाज पठणासाठी मशिदीत येणाऱ्या प्रत्येकाची 'फ्लू डिटेक्टर'ने चाचणी... मुंबई शहरातील भेंडी बाजार येथील बिलाल मशिदीतील स्तुत्य उपक्रम हेही वाचा...#CORONA : मशीद बंद ! कॅम्प भागातील इराणी इमाम वाडा मशीद ट्रस्टचा निर्णय
शुक्रवारी मशिदीत नमाज अदा करणाऱ्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एक वेळच्या नामाजच्या जागी दोन जमात करण्यात आल्याचेही बिलाल मशीद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण राहून प्रत्येक मुस्लिम बांधवाला नमाज अदा करायला मिळेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहो. रविवारी जनता कर्फ्युला आमचा पाठिंबा असल्याचे बिलाल मशीदचे व्यवस्थापक फैय्याज सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. महाराष्ट्रात जवळपास 52 रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात नागरिकांनी एकत्र येऊ नये म्हणून आव्हान केले जात आहे.