मुंबई - भाजप दहशत निर्माण करून बीडचा बिहार करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तत्काळ बीड मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
बीड मतदारसंघ अतिसंवेदनशील जाहीर करा - नवाब मलिक - bajrang sonawane
भाजपला आपला पराभव दिसत आहे, त्यामुळेच असे कृत्य केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर केज येथे भाजपच्या गुंडांनी हल्ला केला असून या हल्ल्याचा नवाब मलिक यांनी निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर केज तालुक्यातील धर्माळा येथे कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. याअगोदर काँग्रेसच्या लोकांवरही हल्ला करण्यात आला आहे. यातून भाजपला आपला पराभव दिसत आहे, त्यामुळेच असे कृत्य केले जात आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.