महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लोक आंदोलन - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या यात्रेच्या विरोधात खोटा प्रचार भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) लोक आंदोलन झाली आहे असे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nana Patole
नाना पटोले

By

Published : Oct 2, 2022, 3:05 PM IST

मुंबई -राहुल गांधी यांच्या यात्रेला ( Rahul Gandhi Yatra ) मिळणारा प्रतिसाद पाहता भारतीय जनता पक्षाची ( Bharatiya Janata Party ) तडफड सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने उद्देशात महागाई बेरोजगारी हे प्रश्न दिले आहेत. या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष काही बोलत नाही. मात्र राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या यात्रेच्या विरोधात खोटा प्रचार भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) लोक आंदोलन झाली आहे. महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांनी "चले जाव"यात्रा ज्याप्रकारे झाली होती, तसेच आता राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा होत असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष आहे असे नाना पाठवले यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर आरोप लावला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ?राज्यामध्ये एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर झाला आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारच गणेशोत्सव काळात बंदूक काढून गोळीबार करतात. तर, एक मंत्री महाराष्ट्राला भिकारी करेन असे वादग्रस्त वक्तव्य करतात. राज्य सरकार पोलिसांवर दबाव टाकून राजकीय पक्षाचे काम करायला लावत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.

जनतेची काम करा दसरा मेळावा काय करताय?सध्या सगळीकडे दसरा मेळाव्याची ( Dussehra Melawa ) चर्चा आहे. करोडो रुपये दसरा मेळाव्यासाठी खर्च केले जात आहेत मात्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचे आणि इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सत्तेत बसला आहात तर जनतेची काम करा असा टोला नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेतून लगावला.

टोल लावून जनतेची दुहेरी लूट -इंधनावर लावलेल्या कराच्या माध्यमातून केंद्र सरकार आधीच पैसे घेत आहे. या करातून रस्ते तयार करण्यासाठी पैसे घेतले जातात मात्र रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर कर लावला जातो ही जनतेची दुहेरी लूट आहे. मात्र जनतेची ही दुहेरी लूट काँग्रेस होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात टोल मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही नाना पटोले यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details