महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भानूशाली इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; अद्याप बचावकार्य सुरू

सीएसटी येथील धोकादायक असलेली भानूशाली इमारत खाली न केल्याने अखेर तडे जाऊन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

By

Published : Jul 17, 2020, 8:51 AM IST

भानूशाली इमारत
भानूशाली इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; अद्याप बचावकार्य सुरू

मुंबई - सीएसटी येथील धोकादायक असलेली भानूशाली इमारत खाली न केल्याने अखेर तडे जाऊन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओ समोरील भानूशाली इमारत काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोसळली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश होता. या इमारतीच्या मालकाला पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र मालकाने दुर्लक्ष केल्याने इमारतीचा काही भाग काल कोसळला.

या इमारतीत एकूण 18 रहिवासी होते. त्यापैकी 12 जणांना काल अग्निशमन दलाने बाहेर काढले. 6 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जेजे रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून अद्याप शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मृतांची नावे

1. कुसुम गुप्ता 45 वर्ष
2. ज्योत्स्ना गुप्ता 50 वर्ष
3. पद्मालाल गुप्ता 50 वर्ष
4. किरण मिश्रा 35 वर्ष
5. मनीबेन फरीया 62 वर्ष
6. अनोळखी महिला 50 वर्ष

जखमींची नावे
1. नेहा गुप्ता 45 वर्ष
2. भालचंद्र कांडू 48 वर्ष
3. शैलेश कांडू 17 वर्ष

ABOUT THE AUTHOR

...view details