महाराष्ट्र

maharashtra

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

By

Published : Dec 19, 2020, 9:00 PM IST

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष म्हणून चरणसिंग सप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

mumbai-congress-president
अध्यक्षपदी भाई जगताप

मुंबई - मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसकडून पत्रक प्रसिद्ध करून भाई जगताप यांच्याबरोबरच अन्य नियुक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.

अध्यक्षपदी भाई जगताप

कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची निवड केली आहे. जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details