महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Best : ओळख पटवून, पुरावे पाहूनच गहाळ मोबाईल 'बेस्ट' प्रवाशांच्या ताब्यात

मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट उपक्रमाच्या बसेसमध्येही प्रवाशी नकळत आपल्या किंमती वस्तू, मोबाईल विसरून जातात. अशा गाळ झालेल्या वस्तू बेस्टकडून जमा केल्या जातात. ज्या प्रवाशांच्या या वस्तू आहेत त्याची ओळख पटवली जाते, त्याच्याकडून ती वस्तू त्याचीच आहे याचे कागदोपत्री पुरावे तपासले जातात. त्यानंतरच गहाळ वस्तू संबंधित प्रवाशाच्या ताब्यात दिली जाते. यामुळे ज्या प्रवाशाची वस्तू आहे त्यालाच ती वस्तू परत केली जाते. इतर कोणाच्या हाती ती वस्तू पडणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

बेस्ट
बेस्ट

By

Published : Mar 21, 2022, 9:37 PM IST

Updated : Mar 21, 2022, 10:29 PM IST

मुंबई- मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट उपक्रमाच्या बसेसमध्येही प्रवाशी नकळत आपल्या किंमती वस्तू, मोबाईल विसरून जातात. अशा गाळ झालेल्या वस्तू बेस्टकडून जमा केल्या जातात. ज्या प्रवाशांच्या या वस्तू आहेत त्याची ओळख पटवली जाते, त्याच्याकडून ती वस्तू त्याचीच आहे याचे कागदोपत्री पुरावे तपासले जातात. त्यानंतरच गहाळ वस्तू संबंधित प्रवाशाच्या ताब्यात दिली जाते. यामुळे ज्या प्रवाशाची वस्तू आहे त्यालाच ती वस्तू परत केली जाते. इतर कोणाच्या हाती ती वस्तू पडणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

३७ मोबाईल गहाळ -मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमाकडून परिवहन सेवा दिली जाते. बेस्टमधून २९ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांच्या वस्तू बसमध्ये राहतात. या वस्तू बसमधील कर्मचारी डेपोमध्ये जमा करतात. डेपोमधील जमा केलेल्या वस्तू वडाळा येथील गहाळ वस्तू विभागात पाठवल्या जातात. या ठिकाणी असलेले सहायक प्रशासकीय अधिकारी (वाहतूक) गहाळ वस्तूवर दावा करणाऱ्या प्रवाशाची ओळख पटवून वस्तू परत करतात. बेस्टच्या बसमध्ये ३१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ३७ मोबाईल आढळून आले आहेत. त्यात ८ नोकिया, ९ सॅमसंग, ३ जिओ, २ लावा, २ आय टेल, १ एसीई तसेच इतर कंपन्यांचे मोबाईल आहेत. हे मोबाईल १३ एप्रिलपर्यंत आपली व वस्तूची ओळख पटवून घेऊन जावेत, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोबाईल परत मिळवण्यासाठीची पद्धत -बेस्ट बसमध्ये आढळून आलेला मोबाईल परत करण्यासाठी मुंबई, उपनगरातील ओळखपत्र आणि निवासी पत्याचा पुरावा जसे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पासपोर्ट, मोबाईलचा कॅश मेमो, मोबाइलचे बिल किंवा सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे पत्र किंवा सिम कार्डच्या तपशीलाचे पत्र किंवा पोलीस एन.सी.ची कागदपत्रे दाखवून गहाळ झालेला मोबाईल आपलाच आहे हे सिद्ध करावे लागते. गहाळ झालेला मोबाईल त्या प्रवाशाचा असल्याची खात्री झाल्यावर प्रवाशाला दिला जातो. यामुळे ज्याचा मोबाईल हरवला आहे, त्यालाच तो परत केला जातो. इतर कोणालाही दिला जात नाही. तसेच दिलेल्या तारखेपर्यंत प्रवाशांनी गहाळ मोबाईलवर दावा केला नाही तर त्यानंतर जे मोबाईल राहिले आहेत ते लिलाव केले जातात, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज व्हराडे यांनी दिली.

रोख रक्कम, मौल्यवान रक्कम परत करण्याची पद्धत -बसमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी, मोती, हिरे अशी मौल्यवान वस्तूं गहाळ झाली असल्यास मुंबई व उपनगरातील ओळखपत्र आणि निवासी पत्याचा पुरावा जसे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र तपासले जाते. त्याच प्रमाणे जी वस्तू गहाळ झाली आहे, त्याबाबत पोलिस एन.सी., एफआयआर, कॅश मेमो किंवा मौल्यवान वस्तूचे बिल तपासले जाते. त्यानंतरच ती वस्तू संबंधितांच्या हाती सोपवली जाते. तर इतर किरकोळ वस्तू मुंबई, उपनगरातील ओळखपत्र आणि निवासी पत्याचा पुरावा जसे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पासपोर्ट पाहून परत केल्या जातात.

या ठिकाणी मिळतात हरवलेल्या वस्तू परत -सहायक प्रशासकीय अधिकारी (वाहतूक), वाहतूक मुख्य कार्यालय प्रशासकीय कार्यालय इमारत, गहाळ वस्तू विभाग, दुसरा मजला, वडाळा बस आगार, टिळक रोड (विस्तारीत), डॉ. आंबेडकर कॉलेज समोर, वडाळा, मुंबई.

हेही वाचा -Special Bench For MP MLA Cases : आजी माजी खासदार-आमदारांविरोधातील गुन्हे निकाली काढण्याकरिता विशेष खंडपीठाची निर्मिती

Last Updated : Mar 21, 2022, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details