महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वबळावर लढण्यास तयार रहा; उध्दव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

भाजपने सेनेला 110 जागा देण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. मात्र, सेनेचा याला विरोध असून 126 जागा शिवसेना, 144 जागा भाजप तर 18 जागा मित्रपक्ष या फॉर्म्युल्याच्या आधारे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून तसे न झाल्यास शिवसेनेने प्लॅन-बी तयार ठेवला आहे.

उध्दव ठाकरे

By

Published : Sep 16, 2019, 1:14 PM IST

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीची घोषणा पितृपक्ष सुरू झाल्यामुळे नवरात्रामध्ये होण्याची शक्यता आहे. भाजप ऐनवेळी जागा वाटपावरून दगा देण्याची शक्यता असल्याने शिवसेनेने प्लॅन-बी तयार ठेवला आहे. तसे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले आहेत.


सेना भवन येथे राज्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतीतही अनेक इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच युतीच्या जागा वाटपाबाबत दोन बैठका पार पडल्या. यात भाजपने सेनेला 110 जागा देण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. मात्र सेनेचा याला विरोध आहे. अखेर 126 जागा शिवसेना, 144 जागा भाजप तर 18 जागा मित्रपक्ष या फॉर्म्युल्याच्या आधारे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-विदर्भातील शिवसैनिक स्वबळावर लढण्यास तयार; इच्छुकांनी दिल्या मुलाखती

ABOUT THE AUTHOR

...view details