Bully Bai Case : तीन आरोपींना बांद्रा न्यायालयाकडून जामीन मंजूर - बांद्रा न्यायालयाकडून जामीन मंजूर बुलीबाई
विशाल झा, मयंक अग्रवाल आणि स्वेता सिंग या तिन्ही आरोपींना बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र दोन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ओंकारेश्वर ठाकूर आणि निरज सिंह असे दोन आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपींना मुंबई पोलीस सायबर सेल अधिकाऱ्यांनी अटक केली होती.
मुंबई -बुली बाई अॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींना बांद्रा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशाल झा, मयंक अग्रवाल आणि स्वेता सिंग या तिन्ही आरोपींना बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र दोन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ओंकारेश्वर ठाकूर आणि निरज सिंह असे दोन आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपींना मुंबई पोलीस सायबर सेल अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मुख्य आरोपी नीरज विष्णोइ यांनी अद्याप जामिन अर्ज दाखल केलेला नाही.