मुंबई : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन ( Balasaheb Thackeray Birth Anniversary ). त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील शक्ती स्थळावर नतमस्तक होत, तसेच कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.
हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब मोठेच.. नेत्यांनी केले अभिवादन बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट म्हणून मोठेच राहणार : भुजबळ
येवला ( नाशिक ):- पालकमंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) आज येवल्यात विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आले होते. नागपूर येथील विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पार्टीने बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न ( Bharatratna For Balasaheb Thackeray ) देण्याची मागणी केली आहे. याविषयी भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला म्हणजे ते लहान किंवा मोठे होणार असं काही नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट म्हणूनच मोठे राहणार आहे. माझा हाच विचार महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देऊन ते मोठे होणार असं नाहीत, तर ते महात्माच आहेत. तसेच महात्मा गांधी यांना भारतरत्न देऊन काही होणार आहे का ते महात्मा गांधी आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राटच आहेत. आजकाल तर भारतरत्न प्रसादासारखे वाटण्यात येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुहृदयसम्राट सम्राट म्हणून जगात नाव आहे असे भुजबळ म्हणाले.
बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा : दादा भुसे
कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) हे देखील आज येवला येथे वीर चक्र प्राप्त माजी सैनिकांना शिवसेनेच्यावतीने बांधून देण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या भूमिपूजनासाठी आले होते. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी होत आहे, त्यावर दादा भुसे म्हणाले की, या मागणीचे मी समर्थन करतो. भारतरत्नला शोभेशी अशी मागणी असून, बाळासाहेब ठाकरे यांनी अथक कष्ट करून शून्यातून हे विश्व निर्माण केले आहे. म्हणून या मागणीचे समर्थन करत आहे. संपूर्ण देशाने याची नोंद घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा, असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.
शिवशाहीचे सरकार यावे ही बाळासाहेबांची इच्छा : सामंत
मुंबई : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केले. बाळासाहेबांची इच्छा होती शिवशाईचे सरकार आले पाहिजे, ती आता पूर्ण होत आहे, असे ते म्हणाले. आजारी असल्यावर टीका करणे बाळासाहेंबांनी आम्हाला शिकवल नाही. जे बाळासाहेंबामुळे मोठे झाले तेच आज टिका करत आहेत हे दुर्दैव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांचं योगदान मोठं : चतुर्वेदी
मुंबई : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी ( Shiv Sena MP Priyanka Chaturvedi ) यांनी ठाकरे यांना अभिवादन केले. राज्यासाठी त्यांचं मोठं योगदान असून, ते अजूनही आपल्यातच असल्याची भावना चतुर्वेदी यांनी यावेळी व्यक्त केली.