महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Paithani birthday cake : मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्नीचा वाढदिवसाच्या निमित्ताने बनवला चक्क पैठणी केक

लोक आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हुबेहूब ताजमहाल देखील बनवत असल्याचे उदाहरण आपण पाहिलेच आहे. त्यात राजकीय व्यक्ती म्हटले तर काही ना काही वेगळे पणा असणारच. असाच वेगळेपणा मनसे नेते बाळा नांदगावकर ( MNS leader Bala Nandgaonkar ) यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पैठणी केक बनवून केला आहे.

Paithani birthday cake
वाढदिवसाच्या निमित्ताने पैठणी केक

By

Published : Nov 29, 2021, 6:37 PM IST

पुणे -वाढदिवसानिमित्त कोण कधी काय करेल आणि आपल्या बायकोला काय गिफ्ट देईल हे सांगता येत नाही. लोक आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हुबेहूब ताजमहाल देखील बनवत असल्याचे उदाहरण आपण पाहिलेच आहे. त्यात राजकीय व्यक्ती म्हटले तर काही ना काही वेगळे पणा असणारच. असाच वेगळेपणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केले आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पैठणी केक ( Paithani cake for wife's birthday ) तयार केला आहे आणि हा केक वाघोली मधील पिराजी फुड बेकरीमध्ये तयार करण्यात आला आहे.

नांदगावकरांच्या पत्नीचा वाढदिवसाच्यानिमित्ताने बनवलेला केक

बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पैठणी केक -

पैठणी म्हटले की महिलांचा आनंद गगनाला पोहोचतो. पैठणी कुणाला आवडणार नाही. पण ही पैठणी नेसायची नाही तर खास खाण्यासाठी तयार करण्यात आली आहे, असे म्हटलं तर? तुम्हालाही एक क्षण ऐकून विचित्र वाटलं ना? जस केकवर वेगवेगळे फोटो किंवा आकाराचे केक तयार केले जातात तशाच पद्धतीने पुण्यातील एका पिराजीस केकने वेगळ्या पद्धतीने केक तयार केला आहे. हा केक पाहून तुम्हाला एक क्षण वाटेल की ही खरीखुरी साडीच घडी घातलेली आहे. पण नाही हा तर चक्क केक आहे.

केकला पैठणीचा हुबेहुब लूक -

हा केक अलंकार तयार करण्यासाठी आणि पैठणीवरचे डिझाइन तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. कारण या केकला पैठणीचा हुबेहुब लूक आणायचा होता. केक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैठणी केक मनसे नेत्यांनी बायकोच्या वाढदिवसा निमित्ताने बनवला होता, असे यावेळी पिराजीस केकच्या संदीप सातव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Shashi Tharoor With Women MPs : शशी थरुर यांनी मागितली माफी, संसदेला म्हणाले होते "आकर्षक ठिकाण"

ABOUT THE AUTHOR

...view details