मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सातपैकी सहा स्थावर मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ही लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आली असून सातव्या संपत्तीसाठी लिलावात बोली लागली नाही. याबरोबरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असलेल्या मृत इकबाल मिरची याच्या नावावर असलेल्या संपत्तीला सुद्धा यावेळेस बोली लावण्यात आलेली नाही.
हेही वाचा -दाऊदची 'मालमत्ता लिलाव प्रकरण', गावातील गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी येथील असलेल्या वडिलोपार्जित बंगल्याचा लिलाव पूर्ण झाला आहे. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव या व्यक्तीने हा बंगला 11 लाख 21 हजार रुपयांची बोली लावून विकत घेतला आहे. दाऊदच्या या सहा मालमत्तांपैकी चार भूपेंद्र भारद्वाज या बोली धारकाने जिंकल्या असून उर्वरित दोन संपत्ती दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी जिंकल्या आहेत. यांचा लिलाव मुंबई 10 नोव्हेंबरला पूर्ण झालेला आहे.
या ठिकाणी आहे दाऊदची संपत्ती
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची रत्नागिरी जिल्ह्यात संपत्ती असून मुंबके गावात सर्वे नंबर ब155 या ठिकाणी 20 गुंठे जागा आहे. सर्वे नंबर 157 मध्ये 27 गुंठे जागा असून सर्वे नंबर 152 मध्ये एकूण 30 गुंठे, सर्वे नंबर 153 मध्ये 24 गुंठे , सर्वे नंबर 155 मध्ये 18 गुंठे, सर्वे नंबर 181 मध्ये 27 गुंठे जागेवर दोन मजली बंगला व घर अशी मालमत्ता आहे. याबरोबरच सर्वे नंबर 81 मध्ये 30 गुंठे जागा असून या जागेवर पेट्रोल पंप व इतर इमारती उभ्या असल्याचे समोर आले आहे.