महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेत्री पायल घोष लैंगिक छळ प्रकरणात लक्ष द्या, आठवले यांची राज्यपालांकडे मागणी - पायल घोष लैंगिक छळ प्रकरण

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपालांची भेट घेतली. पायलने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे व तिला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी आठवले यांनी राज्यपालांकडे केली.

Payal Ghosh's sexual harassment case
आठवले यांनी घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Sep 29, 2020, 4:39 PM IST

मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री पायल घोष हिच्यासोबत आज राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली. पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. मात्र या प्रकरणाची चौकशी बरोबर होत नसल्याने राज्यपालाने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली.

काही दिवसांपूर्वी पायल हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण एक आठवडा उलटून सुद्धा अनुरागची चौकशी न झाल्यामुळे पायल हिने उपोषणाचा इशारा दिला होता. या प्रकरणाला पुढील दिशा मिळावी, यासाठी आज पायल हिने राज्यपालांची भेट घेतली.

पायलला न्याय मिळावा, यासाठी मी आणि माझा पक्ष प्रयत्न करत आहेत. राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे, यासाठी त्यांची भेट घेतली. अर्धा तास झालेल्या चर्चेत या प्रकरणाची सर्व माहिती राज्यपालांना दिली आहे. पायलच्या जीवाला धोका असल्यामुळे तिला पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी देखील केली आहे असे आठवले यांनी सांगितले.

राज्यपालांनी मला सांगितलं आहे की, तू माझ्या मुलीसारखी आहे. तू घाबरू नकोस. तुला पूर्ण सुरक्षा मिळेल. वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली असल्याचे पायल हिने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details