मुंबई - घाटकोपरमधील छेडा नगर येथून तीन युवकांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील पोलिसांनी या वाहतूक पोलिसाची सुटका केली असून संबंधित तीनही तरुणांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, कारसह तीन जण पोलिसांच्या ताब्यात - traffic police
छेडा नगर येथे 3 तरुणांनी एक कार रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारजवळ गेले. हे तरुण पळून जाऊ नये, म्हणून ते कारमधे बसले. मात्र, या तरुणांनी कार सुरू करून रमाबाई आंबेडकर नगरच्या दिशेने पळ काढला होता.
छेडानगर येथे 3 तरुणांनी एक कार रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारजवळ गेले. हे तरुण पळून जाऊ नये, म्हणून ते कारमधे बसले. मात्र, या तरुणांनी कार सुरू करून रमाबाई आंबेडकरनगरच्या दिशेने पळ काढला. याच वेळी रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी रमाबाई आंबेडकरनगर परिसरातच ही कार अडवली आणि वाहतूक पोलिसाची सुटका केली. यावेळी ताब्यात गेतलेल्या संबंधित तीनही तरुणांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.