महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एटीएस लवकरच सचिन वाझेंचा ताबा देण्याची मागणी एनआयए कोर्टात करणार - एटीएस लवकरच सचिन वाझेंचा ताबा देण्याची मागणी एनआयए कोर्टात करणार

सचिन वाझे अंतरिम जामीन सुनावणीत ठाणे न्यायालयाने सुनावणीची पुढची तारीख 30 मार्च असेल. सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर यांनी माहिती दिली. सचिन वाझे यांचा ताबा आम्हालाच मिळाला यासाठी एटीएस लवकरच NIA कोर्टात मागणी करणार असल्याचेही कालेकर यांनी सांगितले.

Sachin Waze
Sachin Waze

By

Published : Mar 19, 2021, 9:31 PM IST

मुंबई -सचिन वाझे अंतरिम जामीन सुनावणीत ठाणे न्यायालयाने सुनावणीची पुढची तारीख 30 मार्च असेल. सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर यांनी माहिती दिली. सचिन वाझे यांचा ताबा आम्हालाच मिळाला यासाठी एटीएस लवकरच NIA कोर्टात मागणी करणार असल्याचेही कालेकर यांनी सांगितले.

आरती कालेकर यांनी सांगितले, की एटीएसने चार ते पाच पानी असलेला जबाब कोर्टात सादर केला आहे. तो वाचायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आम्ही पुढील सुनावणीची तारीख मागितली आहे. कोर्टाने देखील 30 मार्च ही तारीख दिली आहे.

वाझेंच्या बहिणीने चौकशी याचिका दाखल केली आहे. मी ख्वाजा युनिस केसमध्ये देखील त्यांची वकील होते, तेव्हा देखील त्यांना अडकवण्यात आले होते, आता पुन्हा त्यांना अडकवले जात असल्याचे कालेकर म्हणाल्या.

माझे आणि वाझे यांचे बोलणे झाले नाही, काही दिवसात मी त्यांच्याशी बोलून मग 30 तारखेला उत्तर देईन. सचिन वाझे विरोधात प्रोडक्शन वॉरंट एटीएसला मिळाले आहे. आज सचिन वाझे यांच्या बहिणीने मीडिया कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा अर्ज न्यायालयात केला आहे. काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे तक्रारीत नाव आहे.

आजच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे -

- सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे

- एटीएसने केला कोर्टात दावा

- सचिन वाझे यांचा मनसुख हत्येत हात असल्याचा संशय

- तपासात मिळाले महत्वाचे पुरावे

- सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्ये प्रकरणात सहभाग

- सचिन वाझेचा ताबा मिळावा एटीएसची ठाणे न्यायालयात मागणी

- एटीएसच्या ४ पाणी अहवालात खुलासा

- तसेच NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता ATS ने ठाणे कोर्टातून मिळवली परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details