महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मृत डॉ. पायल या मागासवर्गीय असल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून सतत जातीवाचक टोमणे मारले जात होते. एवढेच नाही, तर कँटीन तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवरही कमेंट करून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

तीन डॉक्टरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By

Published : May 24, 2019, 6:28 PM IST

मुंबई - नायर रुग्णालयात डॉ. पायल सलमान तडवी या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत महिला डॉक्टरच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आगरीपाडा पोलीस ठाण्यात आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तीन डॉक्टरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी नायर रुग्णालयाचे डॉ. हेमा अहुजा, डॉ.भक्ती महिरे, डॉ. अंकिता खंडेलवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 मे रोजी मृत डॉ. पायल तडवी नायर रुग्णालयात २ शस्त्रक्रियांमध्ये सहभागी होत्या. शस्त्रक्रियेनंतर त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. यानंतर बराच वेळ होऊनही त्या फोन उचलत नसल्याने त्यांचे सहकारी रूमवर आले. तेव्हा त्यांना पंख्याला गळाफास घेतलेल्या अवस्थेत पायलचा मृतदेह आढळून आला.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मृत डॉ. पायलला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप डॉ. पायल यांच्या पतीने केला आहे. मृत डॉ. पायल या मागासवर्गीय असल्याने त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून सतत जातीवाचक टोमणे मारले जात होते. एवढेच नाही, तर कँटीन तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवरही कमेंट करून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

पोलिसांनी यासंदर्भात तीनही महिला डॉक्टर आरोपींवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप हे तिन्ही आरोपी डॉक्टर फरार आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details