महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग होणार सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे.

Metro
मेट्रो

By

Published : Mar 29, 2022, 11:36 AM IST

Updated : Apr 1, 2022, 4:30 PM IST

मुंबई -मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सूकर होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे ( Two Metro routes will start in Mumbai ) दोन मार्ग सुरू होणार आहेत. मुंबई मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.

हेही वाचा -No Summer Holidays for School : उन्हाळी सुट्टी का रद्द ? अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता राज्यातील शाळा एप्रिलमध्येही सुरु राहणार!

दोन्ही मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र :मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका मुंबईकरांसाठी खूप महत्वाच्या आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबर २०१५ ला झाले होते. तर, प्रत्यक्षात कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. कोरोनमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिकांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. आता दोन्ही मार्गांवरील सीएमआरएसच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे, बहुप्रतिक्षित पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून, यानिमित्ताने मुंबईचा प्रवास आणखी सुकर होणार आहे.

मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर :मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसरपर्यंत असणार आहेत. या १८.५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च ६ हजार ४१० कोटी रुपये इतका आहे. यात आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीनगर, कामराजनगर, चारकोपर, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्कसह एकूण १६ स्थानके असणार आहेत.

मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर :मेट्रो ७ ही अंधेरी - पूर्व ते दहिसरपर्यंत असणार आहे. या १६.४७ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च ६ हजार २०८ कोटी रुपये इतका आहे. यामध्ये दहिसर पूर्व ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी पूर्व अशी १३ स्थानके असणार आहे.

सध्या अंधेरी ते घाटकोपर मेट्रो धावत असून येत्या गुढीपाडव्याला मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. दोन्ही मार्गांवर एकत्रितपणे पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर धावणार असून, या दोन्ही मार्गिकेचे खास वैशिष्ट म्हणजे या दोन्ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहेत. तसेच, तिकीट दर किमान 10 रुपये असून कमाल दर 80 रुपये इतका असेल.

मेट्रो 2 अ हा मार्ग दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर स्थानकापर्यंत म्हणजे 18.5 किमी लांबीचा असणार आहे. दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, धनुकरवाडी, वळणाई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डी एन नगर असे स्थानक असणार आहेत. मेट्रो 7 मार्गावर 14 स्थानक आहेत. त्यामध्ये दहिसर पूर्व ओवरी पाडा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देवीपाडा, मागाठाणे, बोईसर, आकृर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व, जोगेश्वरी पूर्व, शंकरवाडी, गुंदवली या स्थानकांचा समावेश आहे.

हेही वाचा -वीज कर्मचारी संपावर ठाम; राज्य सरकारकडून मंगळवारची नियोजित बैठक रद्द

Last Updated : Apr 1, 2022, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details