ठाणे - फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ( Assistant Commissioner Kalpita Pimple resume service ) आणि त्यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे पुन्हा एकदा आपल्या सेवेत रुजू झाले आहेत. तब्बल 3 महिन्यांच्या वैद्यकीय सुट्टीनंतर त्यांनी प्रथमच ठाणे महापलिकेच्या मुख्यलायत पाऊल ठेवले.
हेही वाचा -Thane 7 Corona negative report : हुश्श !!! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
झालेल्या हल्ल्याला न घाबरता पुन्हा त्याच ठिकाणी काम करण्याची इच्छा पिंपळे यांनी दर्शविली असून, भविष्यात सतर्क राहून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्पिता पिंपळे यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली असता, महापौरांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक पवन कदम, उपायुक्त वर्षा दीक्षित व अश्विनी वाघमळे उपस्थित होत्या.
अनधिकृत फेरीवल्यावर कारवाईच्या दरम्यान झाला होता हल्ला
अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी हल्ला झाला. अनधिकृत फेरीवल्यावर कारवाई करण्याच्या दरम्यान हा हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे निकामी झाली असताना तब्बल ३ महिने त्याचावर उपचार सुरू होते. झालेला हल्ला हा माझ्यावर नसून माझ्या कुटुंबीयावर असल्याची प्रतिक्रिया यावेळी कल्पिता पिंपळे ( Kalpita Pimple ) यांनी दिली.