महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर पालिकेच्या सह आयुक्तपदी आशुतोष सलिल यांची नियुक्ती - government

मुंबईत दोनच दिवसांपूर्वी डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली होती. ही इमारत अनधिकृत असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सारकरकडून ही नियुक्ती केल्याची चर्चा आहे.

आशुतोष सलिल

By

Published : Jul 19, 2019, 2:08 AM IST

Updated : Jul 19, 2019, 4:44 AM IST

मुंबई- मुंबई महापालिकेच्या सह आयुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या रिक्त जागी राज्य सरकारने आशुतोष सलिल यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळली होती. ही इमारत अनधिकृत असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सारकरकडून ही नियुक्ती केल्याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेत सह आयुक्त (विशेष) या पदावर निधी चौधरी या कार्यरत होत्या. त्यांच्या वादग्रस्त ट्विट नंतर त्यांची बदली मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात करण्यात आली. त्यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलनाचा पदभार होता. त्यांच्या बदलीनंतर महिनाभर या पदावर राज्य सरकारकडून कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. मात्र, मंगळवारी डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाल्यावर सह आयुक्त या पदावर आशुतोष सलिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी आपला पदभार स्वीकारला.

आशुतोष सलिल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१० बॅचचे अधिकारी असून त्‍यांनी हॉवर्ड लॉ स्‍कूल येथून मास्‍टर ऑफ लॉ (एल. एल. एम.) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्‍यांना सन २०१८-१९ ची हॉवर्ड युनिव्हर्सिटीची फुल ब्राईट स्कॉलरशिप मिळालेली आहे. नॅशनल लॉ स्‍कूल ऑफ इंडिया, युनिव्हर्सिटी, बंगलोर येथून बी. ए., एल. एल. बी. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली आहे. चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून सन २०१४ ते २०१५, वर्धा जिल्ह्याचे जिल्‍हाधिकारी म्‍हणून २०१५ ते २०१६, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा दंडाधिकारी म्‍हणून २०१६ ते २०१८ या विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. आशुतोष सलिल यांचा जन्‍म ५ नोव्‍हेंबर १९८२ रोजी झाला असून ते सन २०१० मध्‍ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले.

Last Updated : Jul 19, 2019, 4:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details