मुंबई - राज्यात लोकसभेच्या ४ टप्प्यात निवडणुका होत आहेत. याचे आश्चर्य वाटते. निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला हे मला कळत नाही असे म्हणत लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
निवडणुकीच्या वेळापत्रकावर अशोक चव्हाणांकडून आश्चर्य व्यक्त - अशोक चव्हाण
निवडणुकीच्या वेळापत्रकावर भाष्य करतानाच चव्हाणांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरही ते बोलले. सुजय विखे यांनी घाईघाईत निर्णय घेऊ नये असा त्यांना माझा सल्ला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण
वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत यावी असे आम्हाला वाटते, पण त्यांनी २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही त्यांना 4 जागा देण्याचे मान्य केले होते. तसेच राजू शेट्टी यांना २ जागा देण्यासाठी आम्ही तयार आहोत, तशी त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले.