महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या श्रमाची चौकशी - आशिष शेलार

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही जलयुक्त शिवारची चौकशी करणार म्हणेज श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय?, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच चौकशीचा अहवाल आल्यानंतर सरकार तोंडावर पडणार असल्याचंही ते म्हणालेत.

Ashish Shelar news
आशिष शेलार

By

Published : Oct 14, 2020, 7:37 PM IST

मुंबई -जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांनी या योजनेत केलेले श्रम अपार आहेत. तुम्ही जलयुक्त शिवारची चौकशी करणार म्हणेज श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय?, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, हे सुडबुद्धीचं राजकारण आहे. पण एकदाची काय ती चौकशी होऊन जाऊद्या, हाताच्या कंगनाला आरसा कशाला? अहवाल आल्यानंतर हे सरकार तोंडावर आपटेल. ज्या पध्दतीने मेट्रो कारशेडसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर आघाडी सरकार तोंडावर पडले तसेच याही चौकशीतून होईल, आज आम्ही मेट्रो कारशेडचा खरा अहवाल उघड केला. त्यामुळे सकारचा हट्ट उघडा पाडला. ते झाकण्यासाठी आता धडपड सुरु आहे, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी यावेळी दिली.

राज्यात जलयुक्त शिवारची एकूण 6 लाख 41 हजार 560 कामे झाली. त्यापैकी कॅगने तपासलेली कामे 1 हजार 128 इतकी आहेत. म्हणजेच केवळ 0.17 टक्के कामांवरून कॅगने संपूर्ण जलयुक्त शिवारचे केलेले मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? याचा अर्थ 99.83 टक्के कामं तपासलीच नाहीत! जलयुक्त शिवारची कामे 22 हजार 589 गावांमध्ये झाली आहेत. अशी माहिती यावेळी शेलार यांनी दिली. दरम्यान ज्या मंत्रीमंडळात ही योजना मंजूर झाली त्या मंत्री मंडळात शिवसेना ही सहभागी होती. त्यामुळे कोण कुणाची चौकशी करत आहे? तेही एकदा जनतेला सांगा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details