महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Shelar on Raut Arrest  : हा तर मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांचा खून- भाजप नेते आशिष शेलार - BJP Leader Ashish Shelar Strong Attack

शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या ईडीच्या कारवाईनंतर त्यांना अटक झाली. त्यानंतर भाजपवर शिवसेनेकडून सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ज्यांनी 672 मराठी कुटुंबांच्या स्वप्नांचा खून केला आहे. ज्यांचे हात 672 मराठी माणसाच्या खुनाने रंगलेत, त्यांची चौकशी सडेतोड चौकशी सुरू आहे, त्यामुळे वाईट वाटण्याचे कारण नाही. असा जोरदार हल्ला ( BJP Leader Ashish Shelar Strong Attack ) त्यांनी केला.

BJP Leader Adv. Ashish Shelar
भाजप नेते आशिष शेलार

By

Published : Aug 2, 2022, 8:10 AM IST

मुंबई :ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले ( Shiv Sena MP Sanjay Raut ) आहेत. ज्यांनी गोरेगावमधील ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला. ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खुनाचे रक्त लागलेय, असे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेच्या खासदारांची चौकशी सुरू आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही, तर मराठी माणसाला फसवणाऱ्यांची सडकून, सडेतोड केलेली चौकशी आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार ( BJP leader MLA Ashish Shelar ) यांनी आज जोरदार हल्लाबोल ( BJP Leader Ashish Shelar Strong Attack ) केला.

हा व्हाईट कॉलर गुन्हा :शिवसेना खासदार संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या कारवाईबाबत भाजपवर झालेल्या टीकेचा समाचार घेत आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका सडेतोड मांडली. गोरेगावच्या पत्राचाळीतील ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा थेट संबंध दिसून आला आहे. सदर शासनाच्या जागेचा अपव्यय करण्यात आला. म्हाडाची मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे तिसऱ्या माणसाचा मालकी हक्क निर्माण करण्यात आला. १ हजार ३९ कोटी रुपयांचा अपव्यय करण्यात आला. ६७२ मराठी कुटुंबांंना घरे खाली करण्यासाठी मनी, मसल्स पाॅवरचा वापर केला गेला.

संजय राऊत यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष हस्तक्षेप : या प्रकरणात मा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मदत करणे हे योग्य नाही. नवीन बांधकामात घरे देतो, असे सांगून १३८ कोटी रुपये गोळा करून त्याचा अपव्यय केला गेला. त्यासाठी पुन्हा युनियन बँक ऑफ इंडियाकडून १०० कोटीचे आणि ILFS कडून २१५ कोटींचे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशांचा अपव्यय करणे, त्यानंतर ही प्रकल्प पूर्ण न करणे अशा गंभीर स्वरूपाचे हे प्रकरण आहे. हा व्हाईट कॉलर गुन्हा आहे. यातील १ कोटी आणि ६० लाख रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात आलेले दिसत आहेत.

शिवसेनेचा थेट सहभाग या प्रकरणात दिसतोय : या प्रकरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचा अपव्यय करण्यात आला. एवढा मोठा घोटाळा केला तरीही हे स्वतःला निर्दोष समजतात. या प्रकरणात मग रोख स्वरूपात किती पैसे आले? या पैशांतून अलिबागला जमिनी खरेदी करताना रोखीने व्यवहार केल्याचे सदर जमीन मालकांनी सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्या शिवसेनेचा थेट सहभाग दिसतोय. खा. संजय राऊत यांचा सहभाग दिसतोय याचा पक्षप्रमुखांनी खुलासा करावा, अशी मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला.

त्याच काळात इतकी मालमत्ता कशी आली :मराठी माणसाचा तथाकथित कैवार घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी हा मराठी माणसांच्या घरांचा जो खून केला आहे त्याचे उत्तर द्यावे, भाजप अशा अनेक बाबी भविष्यात उघड करेन. त्यातील एक पत्राचाळ हे एक मोठे प्रकरण आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध कसा, हे सांगताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्राचाळीतील रहिवाशांच्या झालेल्या फसवणुकीची सविस्तर माहिती दिली. गोरेगाव येथील ४८ एकर म्हाडाच्या जागेवर असणाऱ्या पत्राचाळीतील ६७२ मराठी कुटुंबांची घरे पुनर्विकासासाठी ठक्कर या विकासकाला देण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या कंपनीला मिळाला पुनर्विकासाचा ठेका : त्यानंतर हा प्रस्ताव ठक्कर या कंपनीकडून प्रवीण राऊत यांच्या गुरुआशिष या कंपनीने घेतला. मात्र, २०२२ उजाडले तरी घरे मिळाली नाहीत. या गुरुआशिष कंपनीत प्रवीण राऊत, राकेश आणि सारंग वाधवान हे संचालक असून, ४५ कोटी रुपयांत पुनर्विकास करू, असे सांगून ठक्कर यांच्याकडून हे काम या कंपनीने सन २००७-८ च्या दरम्यान घेतले. त्यामुळे यातील प्रोत्साहन FSI आणि विक्रीचा FSI या गुरुआशिषने खासगी लोकांना विकला जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यातून १ हजार ३९ कोटी रुपये मिळवले. ट्रायपार्टी एग्रीमेंट करून यामध्ये सरकारची फसवणूक केली व हा पैसा वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून आपल्या खात्यावर वळता केला.

पुढे याच प्रकरणात संजय राऊत यांची एन्ट्री : इथेच संजय राऊत यांची एन्ट्री झाली. रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी, परवानग्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा उपयोग करून साम, दाम, दंडभेद करून संजय राऊत यांनी मराठी माणसांची फसवणूक केली. ते या सगळ्या मराठी कुटुंबांंच्या घरांच्या स्वप्नांचा खून करणारे गुन्हेगार आहेत. याच काळात खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून आल्याचे दिसत आहे. सन २०१०-११, आणि २०११-१२ ला वर्षा राऊत यांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख पैसे आले, तर रोख रक्कम किती आली याचा शोध ईडी घेत आहे. हे पैसे का दिले प्रवीण राऊत यांनी? याच काळात संजय राऊत यांनी दादर आणि भांडुपला घर, अलिबागला मालमत्ता खरेदी कशी केली? हा पैसा कुठून आला? असा प्रश्नही याप्रसंगी आशिष शेलार यांनी विचारला आहे.

हेही वाचा : On Occasion of Nagpanchami Festival : जिवंत नागांची पूजा करणाऱ्या बत्तीस शिराळा गावाची गाथा

ABOUT THE AUTHOR

...view details