मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) या महाराष्ट्रात आल्या तेव्हा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) त्यांना भेटायला ( Mamata Banerjee and Aditya Thackeray Meet ) गेल्या होत्या. या भेटीत काय ठरले याचा तपशील त्यांनी दिला नाही. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्यासाठी त्यांना मदत केली का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रासोबत शिवसेनेने केलेला राज्यद्रोह आहे, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केला आहे.
ममता यांच्यावर कारवाई करा
राष्ट्रगीताचा अपमान करणार्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रद्रोह केला आहे का याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. राष्ट्रगीत बसून म्हणणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही शेलार म्हणाले.
प्रियंका चतुर्वेदीला सावरकरांवर बोलण्याचा अधिकार काय..? - शेलार
शिवसेनेच्या खासदारप्रियंका चतुर्वेदी यांनी नुकतीच सावरकरांबद्दल वक्तव्य केले आहे. वास्तविक केवळ खासदारकीसाठी काँग्रेसमधून त्या शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही सावरकरांच्या विरोधात बोलणार्यांना जोडे मारले होते. त्यामुळे सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या चतुर्वेदींना भाजपच्या महिलांनी जोडे मारावेत का, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.