महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Administrator : प्रशासकाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला बळी पडू नये - आशिष शेलार - महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे कामकाज आता प्रशासकाच्या ( BMC Administrator ) हाती असणार आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ( Ashish Shelar hits out at Uddhav Thackeray ) टीका केली.

Ashish Shelar
आशिष शेलार

By

Published : Mar 8, 2022, 12:44 PM IST

Updated : Mar 8, 2022, 5:26 PM IST

मुंबई -मुंबई महानगरपालिकेवर आजपासून प्रशासक नेमला ( Bmc Get State Appointed Administrator ) जात आहे. मात्र, प्रशासकाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याला बळी पडू नये, अशी कोपरखळी भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावली आहे. सत्ताधाऱ्यांनी जाता-जाता मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा हजार कोटींचे 370 प्रस्ताव मंजूर करून घेतले असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी यावेळी केला.

आशिष शेलार यांची सरकारवर टीका
मुंबईकरांसाठी 1.40 लाख कोटी रुपये खर्च केला तर सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुंबईकरांना काय मिळालं असा सवालच आहे. मात्र, यातून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांची संपत्ती वाढली असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला. महानगरपालिकेत केवळ कट कमिशन सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. गिरीश महाजन यांना केवळ कोपरखळी मारली -गिरीश महाजन हे विधानसभेमध्ये झोपले असतांना आशिष शेलार यांनी त्यांना मारलेली कोपरखळी मारून जागे केले. हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपाला चिमटा काढला आहे. यावर बोलताना अशिष शेलार म्हणाले, की आपण गिरीश महाजन यांना केवळ कोपरखळी मारली. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचं काय होईल हे लवकरच समजेल, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
Last Updated : Mar 8, 2022, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details