मुंबई -शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी असून राजकीय स्वार्थासाठी ते चावून फेकण्याचा चोथा नसल्याची टीका भाजपवर केली गेली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी या टीकेला उत्तर देताना सामनाचा अग्रलेख हा शिवसेनेचे वैचारिक दारिद्र्य असल्याचे सांगत शिवसेनेचा भगवा रंग उडालाय तो रंग लावण्याचा वायफळ प्रयत्न सुरू आहे. या अग्रलेखाचा मी निषेध करतो, असे शेलार यांनी म्हटले. कला चित्रकार, शिल्पकार यांना घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात अशिष शेलार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका -
शेलार यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या ड्रग्स प्रकरणावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही जोरदार टीका केली. स्वतः काही करत नाहीत आणि तपास यंत्रणांना काम करू देत नाहीत असे सांगत देशातील कोणत्या राज्यातील मंत्र्याचा जावई गंजेडी म्हणून पकडला गेला आहे? अशा मंत्र्याला लाथ मारून हाकलून काढले पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांवर डाव्या, उजव्या बाजूने कोणाचा दबाव असेल तर भाजप त्यांच्या बाजूने आंदोलन करेल, असे सांगत ड्रग्स प्रकरणावरून सातत्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना धमकावणारे नवाब मलिक यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई न केल्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहित भारतीय यांनी नवाब मलिक यांच्यावर लावलेले आरोप गंभीर असून मालिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा शेलार यांनी केली आहे.
शिवसेनेचा भगवा रंग उडालाय.. सामनाचा अग्रलेख शिवसेनेचे वैचारिक दारिद्र्य - अशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेने सामनातून केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, सामनाचा अग्रलेख हा शिवसेनेचे वैचारिक दारिद्र्य आहे. शिवसेनेचा भगवा रंग उडालाय तो रंग लावण्याचा वायफळ प्रयत्न सुरू आहे. या अग्रलेखाचा मी निषेध करतो.
ashish-shelar-criticism-of-shiv-sena
मुंबईत महाराष्ट्रातील चित्रकार, शिल्पकार व विविध कलाकार आपल्या कलांचे प्रदर्शन भरवत असतात. परंतु मागील दीड वर्षापासून कोरोना संकटांमध्ये त्यांचे प्रदर्शन बंद झाले आहे. त्यांना प्रदर्शन भरवता येत नाही. अनेक कलाकारांची साहित्य सुद्धा पडून आहेत. म्हणूनच या दहा हजार पेक्षा जास्त कलाकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने त्यांना मदत करावी या मागणीसाठी आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली. अन्य राज्यात अशा कलाकारांना तातडीची मदत झाली मग अडचणीच्या काळात महाराष्ट्रात का होत नाही? असा प्रश्नही शेलार यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री स्वतः छायाचित्रकार असताना त्यांचा फोकस या कलाकारांवर का झाला नाही, असा टोमणा ही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
काय आहे सामनाच्या अग्रलेखात -
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-काश्मिरात मेहबूबा मुक्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह, विसरता येईल काय? महाराष्ट्रात शिवसेनेने काय केले व करायला हवे त्यावर सल्ला देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंच्या व्यथा समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चौथा नाही. एका राज्यात गोमांसावरून लोकांना ठार मारायचे व दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची, हे तुमचे बेगडी हिंदुत्व. हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावर ही फुकाची प्रवचने आता बंद करा. कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी त्यांचे मन मरत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत.
Last Updated : Oct 23, 2021, 4:57 PM IST