मुंबई -आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना ( Warkari Pandharpur ) होत असतात. वारकऱ्यांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसटी महामंडळाने ( ST Corporation ) आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच वारकऱ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे ( Warkari given pure water) असे, निर्देश परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी दिले. यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 17 जूनला सायंकाळी मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान ( Pandharpur Yatra ) एसटी प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूप गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे असे परब यांनी म्हटले.