मुंबई -सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल ट्रेन सुरू होताच मध्य रेल्वे मार्गावर स्टंटबाज हिरो पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. रविवारी सायन ते दादर दरम्यान सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एक तरुण धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचा व्हिडीओ 'ईटीव्ही भारत'च्या कॅमेरात कैद झाला आहे. आता या स्टंटबाज हिरोंमुळे रेल्वे पोलिसांची डोके दुःखी वाढली आहे.
समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल -
लोकल ट्रेनच्या प्रवासात थरथराक स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याऱ्या स्टंटबाज हिरोना कोरोना काळात ब्रेक लागला होता. मात्र, आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे धावत्या लोकलमध्ये स्टंट करणारे स्टंटबाज सक्रिय झाले आहे. त्यामुळे आता रेल्वे पोलीस सुद्धा या स्टंटबाजांवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
500 पेक्षा जास्त स्टंटबाजांवर कारवाई -